Sunday , September 20 2026
Breaking News

बिजगर्णी हायस्कूलच्या मैदानावर झोनल‌ माध्यमिक शालेय स्पर्धांचे आयोजन

Spread the love

 

 

 

 

बिजगर्णी : पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूल क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी 9 वाजता संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन बाळू देसूरकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख वक्ते म्हणून वाय. पी. नाईक, अशोक कांबळे उपस्थित रहाणार आहेत.
दीपप्रज्वलन बाळकृष्ण तेरसे, पुंडलिक चव्हाण अशोक गावडा, रेहमान तहसीलदार, पुंडलिक जाधव, गीतेश ठाणब, के. आर. कुन्नूरकर, यांच्या हस्ते आहे. ध्वजारोहन सचिन बाळेकुंद्री, क्रीडा ज्योत स्वागत मनोहर बेळगावकर, साहित्य पूजन उत्तम मोरे, फाईल वाटप ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक, उपाध्यक्ष महेश पाटील, बक्षिसे पूजन मनोहर मोरे, क्रीडा शिक्षक ब्लेझर वाटप गावातील ब्रम्हलिंग सोसायटीतर्फे, तसेच स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक रमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर वैयक्तिक स्पर्धा मुलं मुली, धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळा फेक, थाळी फेक, १०० मि.धावणे, २००मि., ४००मि., ५००मि. ८०० मि, १५००मि, ३०००मि. व ५०००मि.चालणे, अडथळा रिले होईल.
शनिवार १ ऑगस्ट रोजी इनडोअर गेम्स बुद्धीबळ स्पर्धा, सोमवारी ३ ऑगस्ट रोजी मुली १४, १७ वर्षे खालील सांघिक खेळ कब्बडी, खो खो, हाॅलीबाॅल, थ्रोबाॅल, तसेच शेवटच्या दिवशी मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी मुलांचे सांघिक खेळ घेतले जातील, त्या दिवशीच बक्षीस वितरण, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
याच वर्षीपासून बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर एकत्रितपणे बेळगुंदी झोनल केल्यामुळे सतरा माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत पाचशे विद्यार्थी विविध खेळांचे प्रदर्शन घडवतील.
तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *