


बेळगाव : हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी योगगुरू एस. बी. कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद करणारी भाषणे अनंत लाड, संगीता बागी आणि शिवशंकरी नायक यांनी केली.
या कार्यक्रमाला गोपाळराव बिर्जे, बी. के. बिर्जे, प्रवीण पटेल, शिवाजी मुचंडी, छगन पटेल यांच्यासह अनेक महिला व योगसाधक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले आणि गुरु पौर्णिमेचा आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी योगगुरू एस. बी. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन करत योग, शिस्त आणि गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.

Belgaum Varta Belgaum Varta