Sunday , September 20 2026
Breaking News

तारीख पे तारीख! कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुन्हा लांबणीवर

Spread the love

 

बेंगळुरू/नवी दिल्ली : कर्नाटकच्या राजकारणात मोठे कुतूहल निर्माण झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला “तारीख पे तारीख” मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी होणारी महत्त्वाची बैठक अचानक रद्द करण्यात आली. आता ही बैठक गुरुवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा आणि नव्या मंत्र्यांच्या यादीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद हे गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. दरम्यान, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे ३० हून अधिक आमदारही लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

मात्र, नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सुरू असलेले आंदोलन, संसदेचे कामकाज आणि पक्षाच्या इतर महत्त्वाच्या बैठका यांमुळे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील चर्चा सातत्याने पुढे ढकलली जात आहे.

यामुळे बुधवारी अपेक्षित असलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पुन्हा पुढे गेला असून, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमधील इच्छुक आमदारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष आता दिल्लीतील या बैठकीकडे लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *