Monday , September 21 2026
Breaking News

मुक्तांगण विद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालय, भाग्यनगर येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मराठा मंडळाचे निवृत्त मुख्याध्यापक नारायण बाळेकुंद्री हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात हर्षिता हुगी यांनी स्वागत करून केली. त्यानंतर रोहित बजंत्री यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी रितिका गुंजीकर, सहना एकबोटे, अक्षय पौदाद आणि देवश्री राऊत यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व विषद करणारी मनोगते व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे नारायण बाळेकुंद्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ए. एल. गुरव आणि चिटणीस आर. वाय. पाटील यांच्या हस्ते बाळेकुंद्री यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या प्राचार्या सविता जे. के. यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल होणगेकर आणि सुप्रिया टोणपे यांनी केले, तर आदित्य बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती लाभली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *