Sunday , September 20 2026
Breaking News

श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न

Spread the love

 

 

बेळगाव : महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्रात गुरु पौर्णिमेच्या पावन निमित्ताने बुधवारी (दि. २९ जुलै) विविध धार्मिक कार्यक्रमांनी युक्त गुरु पौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या निमित्ताने श्री स्वामी समर्थ अभिषेक व पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेदमंत्रांच्या मंगल घोषात संपन्न झालेल्या अभिषेक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. त्यानंतर पारायण, नामस्मरण आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या पवित्र सोहळ्यास मोठ्या संख्येने स्वामीभक्तांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा अर्पण केली. संपूर्ण कार्यक्रम भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व स्वामीभक्तांचे श्री स्वामी समर्थ आराधना केंद्र, महाद्वार रोड, बेळगाव यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *