Sunday , September 20 2026
Breaking News

कोट मराठी शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

दड्डी : कोट येथील मराठी प्राथमिक शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच निसर्गाविषयी प्रेम आणि जबाबदारीची भावना रुजावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. शशिकांत शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज, जंगलांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व तसेच पाणी आणि माती यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांना “झाडे लावा, झाडे जगवा”, प्लास्टिकचा वापर टाळा, पाण्याची बचत करा, परिसर स्वच्छ ठेवा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करा असा संदेश देण्यात आला. प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. कोतेकर होते. यावेळी श्री. डी. एम. पाटील, शिक्षिका सौ. प्रतिभा चव्हाण, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे (एसडीएमसी) अध्यक्ष श्री. पुन्नाप्पा प्रधान, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *