Friday , July 31 2026
Breaking News

प्रतिभा पोषक परीक्षेत अक्कोळ हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व हुशार विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये अक्कोळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अक्कोळ हायस्कूलचे श्लोक, चिमगावे, स्नेहल, रेंदाळे, चैत्राली किल्लेदार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
प्रतिभा पोषक परीक्षेत निपाणी तालुक्यातून एकूण पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी अक्कोळ हायस्कूलचे तीन विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे पुढील शिक्षणासाठी टॅब देऊन सन्मानित करण्यात आले. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक साधनांचा लाभ मिळणार असून फाउंडेशनकडून दररोज शैक्षणिक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल अक्कोळ हायस्कूलतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा

Spread the love    प्राचार्य एम. एम. हुरळी‌; बागेवाडी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *