Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली शिक्षिकेची तब्बल 30 लाखांची ऑनलाइन फसवणूक

  बेळगाव : ऑनलाईन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील एका शिक्षिकेची तब्बल ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ऑनलाइन काम करून सहज पैसे …

Read More »

विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे

  बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या फेस रिडिंग हजेरीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही ‘निरंतर’ ऍपद्वारे उपस्थिती नोंदविण्याची नवीन प्रणाली सुरू केली आहे. मात्र या नव्या व्यवस्थेचा पहिलाच दिवस अनेक तांत्रिक अडचणींमुळे गोंधळाचा ठरल्याचे चित्र राज्यभरातील शाळांमध्ये पाहायला मिळाले. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार …

Read More »

मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत; दुबार पेरणीचे संकट

  बेळगाव : यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप हंगामातील शेती कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीसह खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ …

Read More »

बिजगर्णी हायस्कूल मधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सायकली‌ वितरण

  बेळगाव : बिजगर्णी येथील हायस्कूलमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नुकताच एका कार्यक्रमात सायकली‌‌ वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले. संस्था सचिव ए एल निलजकर यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस एम जाधव उपस्थित होते. वाय पी …

Read More »

दहावीत उत्तीर्ण करण्याचे आमिष; विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचा शिक्षकावर आरोप, चिक्कोडीत खळबळ

  चिक्कोडी : पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आल्याचा आरोप समोर आला आहे. येथील एका सरकारी उर्दू हायस्कूलमधील कन्नड विषयाच्या शिक्षकावर दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवत लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

कन्नडसक्ती मोर्चाची जनजागृती उद्या “या” भागात होणार

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दिनांक २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी निघणाऱ्या या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी उद्या बुधवार दिनांक १७ जून (बुधवार) रोजी जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली आहे. या जनजागृती …

Read More »

ऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणी

  बेळगाव : उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढवून औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी, अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली आहे. मंगळवारी बेळगाव शहर भेटीवर आलेल्या केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या

  बेळगाव : कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चासंबंधी चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी दुपारी ठीक तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदानी बैठकीला …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चाला युवा समिती सीमाभागचा पाठिंबा

  शुभम शेळके यांच्यावरील पोलिसी कारवाईचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची बैठक आज १६ जून रोजी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे प्रस्तावित व उद्देश संघटनेचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगताना येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या कन्नडसक्ती विरोधी महामोर्चात …

Read More »

प्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; त्रिशूळ वितरण आणि शस्त्रप्रदर्शनाचा आरोप

  हुबळी : द्वेषपूर्ण भाषण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य उल्लंघनाच्या आरोपांप्रकरणी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध हुबळी उपनगर पोलिस ठाण्यात पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार, हुबळीतील आर. एन. शेट्टी कल्याण मंडप येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान लोखंडी शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले तसेच महिलांना त्रिशूळाच्या आकाराची शस्त्रे वितरित केल्याचा …

Read More »