बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या कन्नड सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेला मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असून प्रशासनाच्या दबावाला किंवा दडपशाहीला बळी न पडता मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे, असे ठाम आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. …
Read More »वीजबिलाच्या थकबाकीमुळे तहसील कार्यालय अंधारात; महसूल गोळा करणाऱ्या खात्याकडेच निधीचा अभाव
बेळगाव : तालुक्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या महसूल विभागालाच वीजबिल भरण्यासाठी निधी नसल्याचे धक्कादायक वास्तव बेळगाव तहसीलदार कार्यालयात उघड झाले आहे. तब्बल १ लाख ७१ हजार रुपयांच्या थकीत वीजबिलामुळे हेस्कॉमने मंगळवारी तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संपूर्ण कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. …
Read More »बंद घर फोडून ३.७४ लाखांचा ऐवज लंपास; विधवा महिलेवर दुःखाचा डोंगर
बेळगाव : बेळगावातील खासबाग परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाटील गल्ली, खासबाग येथे सोमवारी ही चोरी उघडकीस आली असून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी सीमा उत्तम वांजरे यांनी शहापूर …
Read More »राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 28 जून रोजी
बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम रविवार, दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे थेंब पाजणे अनिवार्य असल्याची माहिती शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव ऋत्विक पांडे यांनी दिली. गेल्या 14 वर्षांपासून भारत पोलिओमुक्त असला तरी जगातील काही भागांमध्ये …
Read More »नाना चुडासमा जयंती साजरी रक्तदानातून
जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वी बेळगाव : जायंट्स मेन बेळगाव व जायंट्स सखी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला …
Read More »बेळगावच्या वाहनधारकांना मोठा दिलासा! वाहतूक दंडावर ५० टक्के सवलत; २१ जून ते १० जुलैपर्यंत विशेष योजना
बेळगाव : वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे थकीत ई-चलन असलेल्या वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाटक सरकारने मे २०२६ पूर्वी नोंद झालेल्या सर्व प्रलंबित वाहतूक ई-चलन दंडावर ५० टक्के सवलत जाहीर केली असून ही विशेष योजना २१ जून २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त …
Read More »प्रेयसीसोबत संसार थाटण्याच्या हव्यासातून पत्नीची हत्या; अपघाताचा बनाव पोलिसांनी उघड केला
बेळगाव : प्रेयसीसोबत राहण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याचा बनाव रचणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. गोकाक तालुक्यातील शिंदीकुराबेट गावात उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव सक्कुबाई पाटायत असे असून, त्यांचे पती संतोष पाटायत …
Read More »भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी बेळगाव : देशातील भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘भाषिक अल्पसंख्याक आयुक्त’ (Commissioner for Linguistic Minorities) पदावर तातडीने नियुक्ती करावी तसेच चेन्नई येथील कार्यालयात सहआयुक्त श्री शिवकुमार हे निवृत्त झाले असून त्यांच्याकडे असलेले सह आयुक्त पद रिक्त आहे तरी त्या रिक्त …
Read More »‘मराठी हक्कांवर ठोस आश्वासन द्या, अन्यथा २२ जूनचा मोर्चा अटळ’; प्रशासनासमोर म. ए. समितीचा ठाम निर्धार
बेळगाव : मराठी भाषेतील कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांवरील मराठी फलकांच्या मागणीसाठी २२ जून रोजी जाहीर करण्यात आलेला मोर्चा मागे घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असले, तरी “ठोस ग्वाही मिळाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, …
Read More »मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे विविध सेवा उपक्रम; योग दिनही साजरा
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने विविध जनजागृती व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, तेलमुक्त (नो ऑईल) पाककला प्रशिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta