


बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात किशोर काकडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू व गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित कथा सादर केली. रेल्वेतून फेकल्यानंतरही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी देशासमोर उभा केलेला आदर्श उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत ऐकला.
कार्यक्रमाची सुरुवात पांडुरंग कारकल यांनी प्रार्थनेने केली. त्यानंतर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, सतीश देशपांडे, औदुंबर शेट्ये, हरेश जाधव, अरविंद मुतकेकर, अशोक लोकूर, अरुण धोत्रे, श्रेयस चौगुले, वनिता जोशी, सोनिया सरोदे आणि शोभा हतरकी यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे वातावरण आनंददायी व उत्साहपूर्ण राहिले. शेवटी विठ्ठल पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta