Sunday , August 16 2026
Breaking News

शिवमोग्यात मुसळधार पावसाचा कहर; दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Spread the love

 

 

बंगळुरू/शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. इंदिरा नगर परिसरात पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग एका घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना अचानक दरड घरावर कोसळली. त्यामुळे कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत मूळ कोप्पळ जिल्ह्यातील ३५ वर्षीय मल्लिकार्जुन, त्यांची २८ वर्षीय पत्नी नागवेणी आणि त्यांचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला.

याशिवाय, शेजारील शेडमध्ये राहणारी आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्कालीन सेवा आणि पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य हाती घेत ढिगाऱ्याखालून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

गेल्या काही दिवसांपासून मलनाड भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना डोंगर उतार आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *