येळ्ळूर : येळ्ळूर येथील चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर येळळूर ग्रामपंचायतीच्या वतीने भराव टाकण्यात आला होता. पण रस्त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. याची दखल घेत या भागातील सामाजिक कार्यकर्ते यल्लूपा पाटील यांनी उर्वरित. रस्त्यावर भरव टाकून रस्त्याचे काम पूर्ण केले. त्याबद्दल या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
चांगळेश्वरीनगरचा झपाट्याने विस्तार होत असून येथील मुख्य रस्ता अनेक दिवसांपासून खड्डेमय झाला होता. या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिकांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच मच्छे, झाडशापूर आणि इतर गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

Belgaum Varta Belgaum Varta