


बंगळुरू : राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होण्याची शक्यता असून, अनेक नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील संभाव्य मंत्र्यांची यादी सध्या चर्चेत असून, त्यामध्ये अजय धर्मसिंग (कलबुर्गी), यशवंतरायगौडा पाटील (विजापूर), शरथ बच्चेगौडा (बंगळुरू ग्रामीण), रिजवान अर्शद (बंगळुरू), ए. एस. पोनण्णा (कोडगू), एस. एस. मल्लिकार्जुन (दावणगेरे), लक्ष्मी हेब्बाळकर व लक्ष्मण सवदी (बेळगाव), रघुमूर्ती (चित्रदुर्ग), अन्नपूर्णा तुकाराम (बल्लारी), विजयानंद काशप्पनवर (बागलकोट), पुट्टरंग शेट्टी (चामराजनगर), रुद्रप्पा लामाणी (हावेरी), शिवण्णा (आनेकल), चेलुवरायस्वामी (मंड्या), संतोष लाड (धारवाड), शिवलिंगेगौडा (हासन), नारायणस्वामी (बंगारपेट, कोलार) आणि झमीर अहमद खान (बंगळुरू) यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
या संभाव्य यादीतील काहींना मंत्रिपद देण्याबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधणे आणि पक्षातील नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
विविध जिल्ह्यांना प्रतिनिधित्व देत प्रशासनात संतुलन राखण्याचा प्रयत्न या विस्तारातून केला जाणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळात अखेर कोणाला स्थान मिळणार याबाबत अंतिम निर्णय शपथविधीपूर्वीच स्पष्ट होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta