Friday , October 23 2026
Breaking News

पायोनियर बँकेच्या सभासदांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : येथील दि पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे यंदाही सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सभासदांच्या ज्या मुलांनी दहावी व बारावी परीक्षेत 85 टक्केहून अधिक तसेच डिप्लोमा, इंजीनियरिंग, पदवी, पदव्युत्तर अंतिम परीक्षेत 75 टक्के हून अधिक गुण मिळविले असतील तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कार मिळविले असतील अशा बँकेच्या अ वर्ग सभासदानी अशा मुलांच्या गुणपत्रिकेची/सर्टिफिकेटची झेरॉक्स पायोनियर बँकेच्या कोणत्याही शाखेत 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आणून द्यावी. असे आवाहन पायोनियर बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी केले आहे. पात्र पाल्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष समारंभात गौरविण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *