Sunday , August 16 2026
Breaking News

ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू : बाळू देसूरकर

Spread the love

 

बिजगर्णी : ग्रामीण भागात कष्ट करणारे खेळाडू आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे सातत्याने सराव‌ करायला शिका. जिद्द चिकाटी ठेवा. राष्ट्रीय स्तरावर जाण्याचं स्वप्न बघा. ग्रामीण पश्चिम विभागांमध्ये सुसज्ज सुविधा असलेले‌ भव्य क्रीडांगण असायला हवे खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करू. अंगमेहनत महत्त्वाची आहे असे मौलिक विचार उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर यांनी बिजगर्णी येथील भव्य क्रीडांगणावर बेळगुंदी झोनल माध्यमिक शालेय स्पर्धांचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
मोठ्या दिमाखात पाचशे खेळाडूंची उपस्थितीती व सतरा माध्यमिक शाळांच्या साक्षीने बेळगुंदी झोनल माध्यमिक क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी बिजगर्णी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव उपस्थित होते.

प्रारंभी शाळेच्या विद्यार्थ्यिनिनी‌ स्वागत गीत सादर केले. उपस्थित‌ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धांचे शानदार उद्घाटन फित कापून व श्रीफळ वाढवून तसेच कबुतरे उडवून बाळू देसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा ज्योत स्वागत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष‌ मनोहर बेळगावकर यांनी केले.

यावेळी ध्वजारोहण युवा नेते सचिन बाळेकुंद्री यांच्या हस्ते झाले.
कु. निकिता अष्टेकर हिने खेळाडूंना शपथ दिली.
याप्रसंगी क्रीडा साहित्य पूजन कॅप्टन उत्तम मोरे, फाईल वाटप रेखा नाईक व उपाध्यक्ष महेश पाटील, ट्रॉफीचे पूजन मनोहर मोरे, तसेच उपस्थित क्रीडा शिक्षकांना ब्लेझर वाटप गावातील ब्रम्हलिंग सोसायटीचे संचालक मंडळामार्फत प्रदान करण्यात आले. यावेळी‌ अशोक कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी अपयशाने खचू नका पुन्हा पुन्हा यशासाठी खिलाडूवृत्ती दाखवा. सांघिक भावना महत्त्वाची आहे. बेळगुंदी क्लस्टर व हिंडलगा क्लस्टर मधील सतरा माध्यमिक शाळा एकत्रित आल्यामुळे ही‌ क्रीडा पंढरी पावसातही प्रफुल्लित झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धा ग्रामीण भागातील क्रीडा रसिकांना पर्वणी ठरणार आहे.
उपस्थित सर्वांचं यावेळी संस्था व शाळेतर्फे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर बेळगाव ग्रामीणच्या क्रीडाधिकारी साधना भद्री, एस एम जाधव, बाळू देसूरकर, सचिन बाळेकुंद्री, निंगापा जाधव, अशोक गावडा, रेहमान तहसीलदार, पुंडलिक जाधव, गीतेश ठाणब, कल्लापा कुन्नूरकर, यल्लापा बेळगावकर, अर्जुन निलजकर, वाय एच पाटील, के आर भास्कर, मारुती जाधव, मनोहर पाटील, सतिश पाटील, अविनाश कांबळे, सुरेश कांबळे परशराम भास्कर, मारुती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खेळाडूंचं शिस्तबद्ध संचलन कबुतरांची आकाशातील उंच भरारी, कौतुकाचे आकर्षण ठरले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश कांबळे यांनी, सूत्रसंचालन आर पी सरवणकर, आभार क्रीडा शिक्षक ए.एम. दरेकर‌ यांनी मानले.
यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *