Sunday , August 16 2026
Breaking News

अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील

Spread the love

 

बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा

निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी १९९० साली ज्या उद्देशाने संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. यंदा संस्थेला १८.३२ कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी दिली.
येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेच्या‌वार्षिक सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
अभिनंदन पाटील म्हणाले, अहवाल सालात संस्थेत एकूण २३ हजार ३४२ सभासद, ७.१ कोटी रुपये भांडवल, १७.४ कोटी निधी असून अहवाल सालात १७२६.१७ कोटी इतकी ठेव आहे. ३.८८. कोटी रुपयावर गुंतवणूक केली आहे. १२५५.९९ कोटी कर्ज वितरण करून ८ कोटी ३२ लाखांचा निव्वळ नफा झाले आहे.
प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. यावेळी उत्कृष्ट शाखा म्हणून कोगनोळी तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बेळगाव शाखेचे व्यवस्थापक जीनदत्त वडेर, उत्तम सेवक म्हणून मांगुर शाखेचे अरुण पाटील यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, संचालक सभासद आणि कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होत आहे. संस्थेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. बेळगाव येथे लवकरच १०० खाटांचे‌ रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस सुजय पाटील, सुभाष शेट्टी संचालक जयगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, मुख्य व्यवस्थापक ए. जे. बंकापुरे, राजू पाटील- अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, सुंदर पाटील, अशोक पाटील, इम्रान मकानदार, निरंजन पाटील, आर. टी. चौगुले‌ यांच्यासह विविध ‌शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित सतीश पाटील यांनी आभार मानले.
——————————————————————–
उत्तम पाटलांनी राष्ट्रीय प्रवाहात यावे दिवंगत रावसाहेब पाटील यांच्याबरोबर आपण काम केले आहे. त्यांनी आपणाला मंत्री पदापर्यंत सहकार्य केले आहे. या पुढील काळात आपण मतदारासह उत्तम पाटील यांच्याबरोबर असल्याचे सांगून काँग्रेस पक्षात येण्याचे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *