

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी वंदे मातरम देशभक्तीपर गीत म्हणण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल, नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर आणि संचालकांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याला सलामी देऊन वंदे मातरम वंदे मातरम, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, अशा राष्ट्र प्रेमी घोषणा देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमने, प्रताप पटनशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, पोपटलाल गुजर, स्वप्निल कुरबेट्टी, विवेक परमने, गजानन वसेदार, विजय मेत्रांनी, विजय पोतदार, राजेंद्र बंकापुरे, सीईओ एस. के. अदनावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रश फुटाणे, विद्या कमत, महादेव बडीगेर, चंद्रकांत हंबर, सुरज घोडके, सुजाता जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta