

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित बाल विकास मंदिर, पी. जी. विद्यामंदिर, ए. एस. पाटील हायस्कूल, बी. टी. पाटील अँड सन्स पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ए. एस. पाटील हायस्कूलचे माजी विद्यार्थी व देशसेवेत कार्यरत फौजी लखन पाटील, फौजी स्वाती मोहिते, अलका पाटील अमित पाटील उपस्थित होते..
फौजी लखन पाटील, फौजी स्वाती मोहिते, बी. टी. पाटील अँड सन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि ध्वज स्तंभाचे पूजन करण्यात झाले. संचालक महावीर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी परेडचे सादरीकरण केले. मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार झाला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे तसेच नाटकांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि देशभक्तीच्या भावनेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी अलका पाटील, महावीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पी. आर. मोले यांनी आभार मानले. बी. एस. स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ बी. बी. दादनवर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta