

कडलगे बु. : सीमाकवी रवींद्र पाटील यांना दि. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कडलगे बु. ग्राम समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच मा. परशराम पाटील यांच्या हस्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, मुख्याध्यापक संजय भांदूगरे, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या कार्याचा गौरव होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta