

बेळगाव : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानात आकर्षक आणि मनमोहक आरास करण्यात आली. तिरंग्याच्या भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांची सुरेख सजावट तसेच देशभक्तीची भावना जागविणारी ही आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.
भगवान कपिलेश्वराच्या पावन सान्निध्यात राष्ट्रभक्ती आणि भक्तीभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिर परिसरातील आकर्षक सजावटीने स्वातंत्र्यदिनाचे वातावरण अधिकच भारावून गेले. आरास पाहण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर देवस्थानात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण आरास करण्याची परंपरा आहे.

Belgaum Varta Belgaum Varta