Sunday , August 16 2026
Breaking News

कर्नाटक पब्लिक स्कूल मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : आज शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाला शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सदस्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर होत्या. शाळेच्या वतीने सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन एस.डी.एम.सी. सदस्या सौ. अल्का कुंडेकर व सौ. रेश्मा काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन एस. डी. एम. सी. सदस्य श्री. जोतिबा पाटील व श्री. दिनेश लोहार यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर श्रीफळ श्री. शशिकांत पाटील यांनी वाढविले. यानंतर ध्वजस्तंभाचे पूजन शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. राजेंद्र चलवादी यांनी केले त्याचबरोबर श्रीफळ एस.डी.एम.सी. श्री. मारुती यळगुकर यांनी वाढविले आणि ध्वजारोहण सर्वांच्या उपस्थित शाळेचे एस.डी.एम.सी. अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर यांनी केले. यांनतर झेंड्याला वंदेमातरम म्हणून मानवंदना देण्यात आली. नंतर गावामध्ये गल्लोगल्लीत प्रभातफेरी काढण्यात आली अमर शिवसेना युवक मंडळ सांबरेकर गल्ली येळ्ळूर, तानाजी युवक मंडळ तानाजी गल्ली येळ्ळूर या मंडळांनी आपल्या गल्लीमध्ये शाळेच्या प्रभात फेरीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थित ध्वजारोहण करुन सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट दिले. कलमेश्वर गल्लीतील युवकांनी, सेवानिवृत्त सैनिक श्री. रावजी पाटील, मल्लिकार्जुन गल्ली येळ्ळूर, स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर, नेताजी सोसायटी येळ्ळूर, एस.डी.एम.सी. सदस्या सौ. ज्योती जोतिबा पाटील यांनी चॉकलेट देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे एस.डी.एम.सी. सदस्यांचे कौतुक केले त्याचबरोबर येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने पि.डी.ओ. मॅडम व सर्व कर्मचारीनी सर्व मुलांना बिस्कीट पुडे दिले. यानंतर शाळेमध्ये देशभक्तीपर विद्यार्थ्यांची एकापेक्षा एक उत्कृष्ट भाषणे झाली, देशभक्तीपर गीते सादर केली. भाषण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी श्री.सुर्यकांत महादेव मुरकुटे (सेवानिवृत्त केंद्रीय अधिकारी) यांनी प्रत्येकी 100 रु बक्षीस दिले त्याचबरोबर देशभक्तीपर गीत सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे एस.डी.एम.सी. सदस्य श्री. मारुती यळगुकर यांनी आपल्या आजी कै. गंगुबाई यळगुकर यांच्या स्मरणार्थ प्रत्येकाला पेन दिले. यांनतर एस.डी.एम.सी.उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर यांनी आपल्या विचारांतून सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे कौतुक करत गावातील अनेक मंडळांनी, युवकांनी शाळेच्या मुलांना चॉकलेट दिलेल्या आणि येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करत कौतुक केले. नंतर अध्यक्ष भाषण कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिव्या कुंडेकर यांनी आपल्या भाषणातून सर्वांनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी गावामध्ये शांततेत प्रभात फेरी काढली. भाषणे केली  गीते सादर केली. याबद्दल सर्वांनाचे आभार मानत कौतुक केले. या कार्यक्रमाच्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ. ऐश्वर्या मेणसे टिचर यांनी केले आणि सुत्रसंचलन सौ.मेघा देसाई टिचर यांनी केले. यानंतर आभार श्री. सातेरी पाखरे सरांनी मानले..

या कार्यक्रमाला एस.डी.एस.सी. सदस्य मारुती यळगुकर, चांगदेव मुरकुटे, शशिकांत पाटील, जोतिबा पाटील, दिनेश लोहार, मुर्तिकुमार माने, सदस्या शुभांगी मुतगेकर, मयुरी कुगजी, ज्योती पाटील, अर्चना देसाई, अल्का कुंडेकर, रेश्मा काकतकर शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कडलगे बु. येथे स्वातंत्र्यदिनी सत्कार

Spread the love  कडलगे बु. : सीमाकवी रवींद्र पाटील यांना दि. २६ जून रोजी राजर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *