Sunday , August 16 2026
Breaking News

सरस्वती विद्या मंदिर किणये शाळेत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्यदिन संपन्न

Spread the love

 

बेळगाव : येथील ‘सरस्वती विद्या मंदिर, किणये शाळेत’ भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक आठ वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील नागरिक एकत्र जमले. शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. अनिल पाटील व श्री. निवृती डुकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व ध्वजस्थंबाचे पूजन केले. तसचे श्री. विरेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज फडकल्यानंतर उपस्थितांनी व विद्यार्थ्यानी मिळून ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत व ‘ध्वज गीत’ गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या सोहळ्यानिमित्त शाळेत एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याद्यापिका श्रीमती एस. वाय. बागेवाडी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यानी मराठी, कन्नड व इंग्रजी भाषांमध्ये भाषण केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा निवृत जवान श्री. दयानंद डुकरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासाची माहिती दिली आणि एक आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले. संस्थेचे संचालक श्री. एस डी पाटील सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण यांनी आपले मनोगत मांडले. याशिवाय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या वर्ग सजावट स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ व चॉकलेट वाटप करण्यात आले. त्यानंतर देशसेवेच्या संकल्पाने या आनंददायी सोहळ्याची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

सीमाकवी रवींद्र पाटील यांचा कडलगे बु. येथे स्वातंत्र्यदिनी सत्कार

Spread the love  कडलगे बु. : सीमाकवी रवींद्र पाटील यांना दि. २६ जून रोजी राजर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *