Sunday , August 16 2026
Breaking News

श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

 

खानापूर : श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल हलशी तालुका खानापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सदस्यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. बी. जी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी सदस्य श्री. अर्जुन देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. जी. पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाला श्री. विनायक देसाई, शंकर रागी पाटील, सारंग सुतार, प्रियांका काकतकर, दर्शन पाटील, सकाळचे वार्ताहर मिलिंद देसाई, शाळा सुधारणा सदस्य व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुधन देसाई तर आभार प्रदर्शन सौ. शामल बेळगावकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *