Sunday , August 16 2026
Breaking News

निडगल सिद्धेश्वर मंदिर-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणी संशयित ताब्यात; खानापूर पोलिसांकडून कसून चौकशी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील निडगल येथील सिद्धेश्वर मंदिर आणि खेमेवाडी येथील माऊली मंदिरातील मूर्तींच्या तोडफोडीच्या प्रकरणाचा तपास खानापूर पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

माळअंकले येथील एका शेतकऱ्याने संबंधित व्यक्तीला मंदिरात बसलेल्या अवस्थेत पाहिल्याचे पोलिसांना सांगितले असून, त्याने याबाबत साक्षही दिल्याची माहिती आहे.

ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती कन्नड भाषेत बोलत असून, नाव व गाव विचारले असता ती कोणतीही माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या बोटाला जखम असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पॅन्ट कमरेला बांधण्यासाठी वापरलेल्या कापडाच्या चिंधीचा काही भाग जखमेवर बांधलेला आहे. याच कापडाचा काही भाग मंदिर परिसरात रक्ताचे डाग असलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सर्व बाबींच्या आधारे पोलिस संबंधित व्यक्तीचा मंदिर तोडफोडीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा तपास करत आहेत. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याचा या प्रकरणातील सहभाग निश्चित झालेला नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून नाव, गाव किंवा इतर वैयक्तिक माहिती मिळत नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा, मित्रांचा किंवा परिचितांचा शोध घेण्यासाठी खानापूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

फोटोतील व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईक, मित्र अथवा परिचितांना त्याच्याबाबत माहिती असल्यास तातडीने खानापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन खानापूर पोलीस स्थानकाचे पीआय एल. एच. गोवंडी यांनी केले आहे.

संपर्क : 94808 04033

तसेच निडगल-खेमेवाडी मंदिर तोडफोड प्रकरणासंदर्भात कोणाकडेही महत्त्वाची माहिती असल्यास ती तातडीने खानापूर पोलिसांना द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *