Friday , October 23 2026
Breaking News

बेकवाड येथे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love

 

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासह हिंदू धर्म आणि संस्कृतीवर मार्गदर्शन

बेकवाड : बेकवाड येथे आज हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती किरण मुतकेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रवीणा सुनील फटाण, महिला मोर्चा जिल्हा ग्रामीण सचिव, बेळगाव, माधुरी दोडवाई (डीपीके रेंज फॉरेस्ट ऑफिस, नंदगड) आणि कल्याणी बसुरतेकर, व्याख्यात्या, बेळगाव उपस्थित होत्या.

यावेळी प्रवीणा सुनील फटाण यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करावेत, स्वतःच्या कौशल्यांचा विकास करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबासह समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

माधुरी दोडवाई यांनी महिलांना मार्गदर्शन केले, तर कल्याणी बसुरतेकर यांनी हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कार यांविषयी व्याख्यान दिले. अशा कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये एकोपा वाढतो, सांस्कृतिक परंपरांचे जतन होते आणि सामाजिक जागृती निर्माण होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष आरती किरण मुतकेकर यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता बाळेकुंद्री यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

दुष्काळग्रस्तांच्या यादीत खानापूरचा समावेश

Spread the love राज्यातील आणखी नऊ तालुक्यांना दिलासा; दुष्काळी तालुक्यांची संख्या २२६ वर बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *