Friday , October 23 2026
Breaking News

दुष्काळग्रस्तांच्या यादीत खानापूरचा समावेश

Spread the love

राज्यातील आणखी नऊ तालुक्यांना दिलासा; दुष्काळी तालुक्यांची संख्या २२६ वर

बेळगाव : राज्यात पिकांचे नुकसान आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनत असताना, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील खानापूरसह आणखी नऊ तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २२६ वर पोहोचणार आहे.

नव्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कारवार जिल्ह्यातील दांडेली व जोयडा, शिवमोग्गा जिल्ह्यातील होसनगर व सागर, तसेच मंगळूर जिल्ह्यातील मूडबिद्रे, पुत्तूर आणि मुल्की या तालुक्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाली असून, उर्वरित तालुके दुष्काळ जाहीर करण्यासाठी निर्धारित निकषांची पूर्तता करतात की नाही, याची पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत आणखी काही तालुके दुष्काळाच्या निकषांत बसत असल्याचे स्पष्ट झाल्यास, तेथेही प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *