


तेली-पाटील गल्लीतील बांधकामस्थळी दुर्घटना; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
बेळगाव : शहरातील शहापूर परिसरात बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका गवंडी कामगाराचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. १४) सायंकाळी चारच्या सुमारास तेली-पाटील गल्ली येथे ही दुर्घटना घडली. शिवाप्पा शिवलिंगाप्पा कुरबर (वय ४५, रा. समर्थ नगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेली-पाटील गल्ली येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी काम करत असताना शिवाप्पा हे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाप्पा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Belgaum Varta Belgaum Varta