

बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा अलतगा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस डी एम सी अध्यक्ष श्री. मारुती पावशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री. प्रकाश बेळगावकर जाफरवाडी यांच्याकडून इ 1 ली ते 7 वी प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकाला शैक्षणिक साहित्यासाठी 10000 व एलकेजी बूट सॉक्ससाठी 5000 रुपये श्री. विजय पाटील कंग्राळी के एच यांच्याकडून 5000 रू युनिफॉर्मसाठी तसेच श्री. नामदेव पावशे, श्री. किरण चौगुले, श्री. ज्योतिबा घुग्रेटकर यांच्याकडून 181 विद्यार्थ्यांना दोन वह्या पेन पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच श्री. सागर साळुंखे हिंडलगा यांच्याकडून 21 विद्यार्थ्यांना 2 कॉपीबुक व श्री. पंडित पाटील कंग्राळी के एच यांच्याकडून 1100 रुपये रोख देणगी देण्यात आली.
सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एसडीएमसीकडून लाडू देवस्थान पंचकमिटी कडून मिठाई व इतर देणगीदारांनी चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री. बी. आय. मुगळीकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्रीमती डी. बी. भंडारी यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील देवस्थान पंचकमिटीचे सदस्य एसडीएमसीचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. व्ही एस मनगुतकर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta