

अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न दिवंगत रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून आर्थिक वर्षात १.६३ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. तर ४६९.९० कोटी रुपयांवर उलाढाल झाल्याची माहिती विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची ५० व्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन झाले.
अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, संघाचे ३०६८ सभासद, २ .६२ कोटी ५९ लाखावर भाग भांडवल, ८ कोटी १२,३३ लाखावर निधी, ६६.४६ कोटी ठेवी, ३९,४५,७६ आजारावर बँक शिल्लक,५,६०,२० हजारावर गुंतवणूक, १६ कोटी ७२ लाख ८२ हजारावर बँक कर्ज,५३.७२ कोटी कर्ज वितरण करून संघाला यावर्षी १.५३ कोटीचा नफा झाला आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संघाला ऑडिट वर्ग ‘अ’वर्ग मिळाल्याचे सांगितले.
व्यवस्थापक आर. टी. चौगुले यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले.
यावेळी, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, बाळासाहेब सातपुते, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, नगरसेवक अभय मगदूम,जावेद मकानदार, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, दिगंबर कांबळे, डॉ. शंकर माळी, अशोक बंकापुरे, निरंजन पाटील सरकार यांच्यासह संघाचे सदस्य नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta