Monday , August 17 2026
Breaking News

अर्चना संगीत विद्यालयतर्फे “स्वर सौरभ” कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तसेच स्वर्गीय श्री. रामभाऊ बिजापूरे सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अर्चना संगीत विद्यालयातर्फे “स्वर-सौरभ” या संगीत कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता आयएमईआर हॉल, हिंदवाडी, बेळगाव येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय आशा भोसले यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, वर्षा ऋतुवर आधारित सुरेल गीतांचा बहार रसिकांना अनुभवता येईल.
या कार्यक्रमात अर्चना संगीत विद्यालयाचे ७५ हून अधिक विद्यार्थी आपल्या सुरेल गायनातून गुरूवंदना सादर करतील.

या कार्यक्रमास श्री. अनिल चौधरी, श्री. संजीव अध्यापक, सौ. कुसुमताई कुलकर्णी, श्री. महेश इनामदार आणि श्री. पराग चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सर्व संगीतप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विद्यालयाच्या संचालिका सौ.अर्चना बेळगुंदी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *