Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून निर्घृण हत्या; मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकल्याचा आरोप

  बेळगाव : दहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच साथीदाराने दुसऱ्या विवाहाला विरोध केल्याच्या कारणावरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाजगी शिक्षक असलेल्या आरोपीने वडील आणि मामाच्या मदतीने कट रचून तरुणीचा खून केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह महाराष्ट्रातील तिलारी घाटातील जंगलात फेकून दिल्याचे तपासात समोर …

Read More »

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात एसआयआर कार्याबाबत बैठक यशस्वीरीत्या संपन्न

यमकनमर्डी : भारतीय जनता पक्षातर्फे चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश अप्पाजीगोळ यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार यादी सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) अभियानासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. मतदार यादीचे पुनरावलोकन प्रभावीपणे राबविण्याबरोबरच बूथस्तरावरील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत तुफान हाणामारी; मध्यस्थी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला

  बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन युवकांच्या गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही काही युवकांनी हल्ला केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी संबंधित सर्व संशयित युवकांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. माहितीनुसार, …

Read More »

ख्रिश्चन समाजाला जागा देण्यास मण्णूर ग्रामस्थांचा विरोध

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावातील एका एकर जागेवर मारिया कृपा सोसायटीच्या नावाचा फलक लावण्यात आल्याने गावात वाद निर्माण झाला असून, संबंधित जागा ख्रिश्चन समाजासाठी देण्याच्या कथित निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर देवसकी पंच कमिटी, मण्णूर यांच्या वतीने आयोजित बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. …

Read More »

बेळगावातील शासकीय वसतिगृहात मध्यरात्री विद्यार्थ्यांचे आंदोलन; जेवणात अळ्या, पाणीटंचाईवर संताप

  बेळगाव : संगमेश्वर नगर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी गुरुवारी मध्यरात्री तीव्र आंदोलन छेडले. जेवणात वारंवार अळ्या आढळणे, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि वॉर्डनच्या कथित दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्डन वसतिगृहात आले असताना जेवणाच्या ताटात अळ्या आढळल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. …

Read More »

पावसाअभावी राकसकोप जलाशय तळाला; शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट

  बेळगाव : मान्सूनने दडी मारल्याने आणि अवकाळी पावसानेही साथ न दिल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेला राकसकोप जलाशय अक्षरशः तळाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने घटणाऱ्या पाणीपातळीमुळे आता मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राकसकोप जलाशयातील पाणीपातळी सध्या …

Read More »

दारूच्या नशेत तरुणाचा चाकूने खून; महिला दोषी ठरली, सात वर्षांचा कारावास

  बेळगाव : दारूच्या नशेत किरकोळ वादातून तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खून करणाऱ्या महिलेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी हा निकाल दिला. जयश्री पवन पवार (मूळ रा. गांधीनगर, दांडेली, जि. कारवार; सध्या …

Read More »

म. ए. समितीच्या महामोर्चाला परवानगी देऊ नका; करवेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  बेळगाव : बेळगावमध्ये २२ जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित महामोर्चाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (टी. ए. नारायणगौडा गट) कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी बोलताना दीपक गुडगनट्टी यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती विविध बैठका घेऊन मराठी भाषिकांची दिशाभूल करत असल्याचा …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ अमित शहा यांना निवेदन देणार

  आसाम-मेघालय धर्तीवर तोडग्याची मागणी बेळगाव/कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयाबाहेर मार्ग काढून आसाम-मेघालय सीमावादाप्रमाणे तोडगा काढावा आणि मराठी भाषिकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ शनिवारी (दि. 20) कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कोल्हापुरात उपस्थित …

Read More »

मराठी भाषा प्रेरणा मंच व मराठी भाषा प्रेमी संघटनेकडून मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंच, या मराठी भाषा प्रेमी संघटनेकडून दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. बेळगाव येथील विद्यानिकेतनच्या सभागृहात रविवार दिनांक 21- 6- 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता हा …

Read More »