Monday , August 17 2026
Breaking News

विद्याभारती राज्य अथेलिटिक्स स्पर्धेत संत मीरा शाळेच्या खेळाडूंचे यश

Spread the love

 

बेळगाव : गुलबर्गा येथील चंद्रशेखर पाटील क्रीडांगणावर नुकत्याच झालेल्या विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या अथलेटिक खेळाडूंनी 3 सुवर्ण 4 रौप्य 2 कास्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत प्राथमिक गटात ईश्वरी कुलकर्णी हिने लांब उडीत कास्यपदक तर माध्यमिक गटात संचित धामणेकरने लांब उडीत रौप्यपदक, मेघा कलखाबकर हिने 3000 मीटर धावणे रौप्यपदक, भावना बेर्डे हिने लांबउडी सुवर्णपदक, तिहेरीउडी रौप्यपदक, अनिरुद्ध हलगेकरने 100 मीटर अडथळा शर्यत कांस्यपदक, 4/400रिले रौप्यपदक, निधीशा दळवीने 400 मीटर अडथळा शर्यत रौप्यपदक तर बांबु उडी शर्यतीत श्रेयश किल्लेकर स्वाती फडणाडी यानी सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता या सर्व खेळाडूंची 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या विद्याभारती क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी कर्नाटक विद्याभारती संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, प्रशिक्षक शिवकुमार सुतार यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, व पालक वर्गांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

Spread the love    बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *