Monday , August 17 2026
Breaking News

राज्य पोलीस भरती मंडळातर्फे निपाणीत पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राज्य पोलीस भरती मंडळातर्फे निपाणी शहरात पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. शहरातील निश्चित करण्यात आलेल्या तीन मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासना तर्फे परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
येथील विविध ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ही परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आली होती. सकाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन उमेदवारांना केंद्रात प्रवेश देण्यात आला होता. ओळखपत्रांची तपासणी करूनच उमेदवारांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल फोन, यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेसाठी कडक बंदोबस्तपरीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कॉपी किंवा तोतया उमेदवारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा, महिला पोलीस कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात होते. शेकडो उमेदवारांनी या परीक्षेला हजेरी लावली. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना बसण्यासाठी, पिण्याच्या पाण्याची आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील

Spread the love  बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *