Monday , August 17 2026
Breaking News

“खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

Spread the love

 

बेळगाव : शहरातील प्रसिद्ध “खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीनुसार राहुल शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवराज जाधव उपाध्यक्ष, अमित उचगावकर कार्याध्यक्ष, तर विशाल सनदी उपकार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

मंडळाच्या सचिवपदी सिद्धार्थ मन्नोळकर, उपसचिवपदी सुधीर काकतिकार आणि प्रमोद पाटील, खजिनदारपदी श्रेयश मुतकेकर, तर उपखजिनदारपदी विवेक माळावी आणि अखिलेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय सोशल मीडिया टीममध्ये पंकज कोकितकर, साई चव्हाण आणि स्वप्नील शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल मंडळाच्या सदस्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *