Monday , August 17 2026
Breaking News

आश्चर्य! ही नव्या मंत्र्यांची यादी की जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची? व्हायरल यादीमुळे राजकीय चर्चेला उधाण

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकाच्या राजकारणात सोमवारी होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीत २० आमदारांची नावे असून, ती जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्तीची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या यादीच्या सत्यतेबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे.

व्हायरल पत्रावर एआयसीसीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचा उल्लेख असून, त्यावर १ ऑगस्ट २०२६ ही तारीख आहे. या यादीत लक्ष्मण सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर, जामीर अहमद खान, रिझवान अर्शद, संतोष लाड, शिवानंद पाटील, ए. एस. पोन्णण्णा, तन्वीर सेठ यांच्यासह अनेक आमदारांची नावे आहेत.

दरम्यान, राजकीय वर्तुळात या यादीबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. काहींच्या मते ही यादी पूर्णपणे बनावट (फेक) असू शकते. तर काहींच्या मते, सोमवारी शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची नावे लपवण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठीच ही यादी जिल्हाध्यक्षांच्या नावाखाली प्रसारित करण्यात आली असावी.

काही राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मंत्रिपदासोबतच काही नेत्यांवर जिल्हा संघटनेची जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. त्यामुळे या यादीत दोन बेलगावी आणि दोन बेंगळुरू प्रतिनिधींचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ही यादी प्रत्यक्षात सोमवारी शपथ घेणाऱ्या संभाव्य नव्या मंत्र्यांचीच असू शकते, जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नव्हे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा सोमवारी अधिकृत घोषणेनंतर होण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *