Monday , August 17 2026
Breaking News

महात्मा गांधी संस्थेच्या कथा, कथन स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा, कथन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अॅड नामदेव मोरे उपस्थित होते.
प्रा पी व्ही नाकाडी यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य सावंतवाडीचे भरत गावडे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले.
प्रारंभी संस्थाध्यक्ष वाय पी नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आपले प्रास्ताविक विचार व्यक्त करताना श्री. नाईक यांनी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. शालेय विद्यार्थी पालक शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य ही संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे
यावेळी भरत गावडे यांनी, मराठी भाषा संवर्धनासाठी अशाप्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असते गावागावात साहित्य चळवळ उभी राहिली पाहिजे मराठी भाषेत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन आवश्यक आहे भाषेतील गोडवा सौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी अशा व्यासपीठावर मुलांनी उभं राहून विचार मांडणं आवश्यक आहे.
प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी कथा, कथन करताना प्रभाव पडला पाहिजे विषय मांडणी महत्त्वाची असते आत्मविश्वास हवा विषयावर प्रभुत्व मिळवणे हे सातत्याने वाचनातून घडत जाते असे मौलिक विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात अॅड नामदेव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पुष्कर प. कोलेकर (ठळकवाडी हायस्कूल), द्वितीय क्रमांक कु. आमना खा. सनदी (स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव), तृतीय क्रमांक कु.नागवेणी मा लोहार (स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव)
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कु.दिव्या द. कोले (अतिवाड प्राथमिक शाळा), द्वितीय क्रमांक प्रांजल मा गावडे (नागनवाडी), तृतीय क्रमांक अनन्या ग.पाटील (तुडये)
या विजेता स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह गौरव पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर भरत गावडे, अॅड नामदेव मोरे, सौ.तेजस्विनी संतोष सुतार, लक्ष्मण जाधव, अक्षता र. अष्टेकर, रघुनाथ मोरे, के. जी. मेणसे, यशवंतराव मोरे, यल्लापा बुरुड, प्रणाली कणबरकर, एम. पी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
परिक्षक म्हणून किशोर पाटील, अशोक येटले, भरत गावडे, प्रा. पी. व्ही. नाकाडी यांनी काम पाहिले.
शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
आभार शिक्षिका किरण बा जाधव यांनी मानले.
यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *