

निपाणी (वार्ता) : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१६) सकाळी शाहूनगर वळणावर हा अपघात झाला. त्यामध्ये अशोक बाळू कांबळे (५८, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अशोक कांबळे हे दररोज मुरगुड व कोडणी रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जात होते. रविवारी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे.
अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हिट अँड रन प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करून वाहनाता शोध सुरू केला आहे. याबाबत मुलगा अजित कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta