Monday , August 17 2026
Breaking News

बेळगावात ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून बेळगावात गेली २८ वर्षे श्री गणेश फेस्टिवल आयोजन केले जात आहे. बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे यावर्षी ही ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

गणेश फेस्टीवल माध्यमातून सलग चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोहळ्याच्या अंतिम दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा नवरत्न सन्मानाने सत्कार करण्यात येणार आहे.

यावर्षी दिनांक रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी महिलांच्या पाककला स्पर्धेने श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात होत आहे. फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी मिलेट्स (तृणधान्य) गोड आणि तिखट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पदार्थ घरी बनवून कृती व साहित्य घेऊन आणण्याचे आहे. राळा, भगर (वरी), बाजरी, राजगिरा, नाचणी, चेना, कुठळी, कोदरा, कोराळे, ज्वारी यापैकी कोणताही एक अथवा दोन पदार्थ वापरण्याचे आहेत.

दुसऱ्या दिवशी दिनांक ७ सप्टेंबर रोजी महिलांच्या अठरा वर्षावरील व अठरा वर्षाखालील दोन गटात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी रांगोळी घरातून आणणे आवश्यक आहे. फक्त रांगोळीचा स्पर्धा ठिकाणी वापर करणे आहे. पाककला आणि रांगोळी स्पर्धा शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहेत या दोन्ही स्पर्धांसाठी विजेत्यांना आकर्षक रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

गणेश फेस्टिवल च्या तिसऱ्या दिवशी दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता न्यू गुड शेड रोड येथील श्रीमाता सोसायटी सभागृहात नक्षत्र ग्रुप बेळगाव प्रस्तुत मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी नवरत्न सन्मान सोहळ्याने यावर्षीच्या गणेश फेस्टिवलची सांगता होणार आहे. सामाजिक, साहित्य, संगीत, उद्योग, क्रीडा,श्रम, कृषी, कला तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था यांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या संध्या किरण सेवा केंद्रात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *