

बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर आहेत. शालेय अभ्यासाबरोबर काव्य लेखनाचे ज्यांना आवड आहे अशा बालकवींना प्रोत्साहन देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनात वाचक आणि पुस्तक यांना जोडणारा दुवा असणारे ग्रंथपाल व ग्रंथालयातील कर्मचारी यांचे ग्रंथालय सेवेतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. बाळू जायनाचे (धामणे), पिराजी कुराडे (खानापूर), जयश्री सुतार (शहापूर), यशवंत देसाई (बेळगाव), सुशील धामनेकर (मच्छे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta