बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित 22 जून रोजीच्या कन्नडसक्ती आंदोलनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नसल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे. धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर प्रस्तावित सार्वजनिक मोर्चा व रॅली काढण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. दिनांक ८ जून २०२६ रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने …
Read More »अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला कोल्हापुरात स्थानबद्ध
कोल्हापूर : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अडवून करून स्थानबद्ध केल्याची घटना आज घडली. या प्रकारामुळे सीमाभागातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत आपली भूमिका आणि मागण्या केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ कोल्हापूर …
Read More »राकसकोप धरण परिसरात पार्ट्यांवर बंदी; नियम मोडणाऱ्यांना ५ हजारांचा दंड
बेळगाव : निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर मद्यपान, हुल्लडबाजी आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने राकसकोप धरण परिसरात पार्ट्या करण्यास ग्रामस्थांनी सक्त बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करताना आढळणाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी हजगोळी येथील निसर्गरम्य चाळोबा मंदिर परिसरात पर्यटकांच्या अनियंत्रित वावरामुळे ग्रामस्थांनी …
Read More »अमित शाह यांच्या भेटीसाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना हत्तरगी टोलवर अडवले; महामार्गावर ठिय्या आंदोलन
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला कर्नाटक पोलिसांनी हत्तरगी टोल नाक्यावर रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ समितीचे नेते व कार्यकर्ते महामार्गावरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करत आहेत. शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी …
Read More »वीज वितरणाच्या खाजगीकरणाला शेतकरी संघटनांचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : वीज वितरण क्षेत्रातील प्रस्तावित खाजगीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी शेतकरी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर केले. सरकारने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या अन्नसुरक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणारा …
Read More »शुभम शेळके यांच्या विरोधातील नोटीशीला न्यायालयात आव्हान
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी माळमारुती पोलीस स्थानकाच्या तक्रार अर्जानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शुभम शेळके यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पाच लाख रुपयांचा बॉण्ड व तितक्याच रकमेचे दोन जामीनदार घेऊन पोलीस उपायुक्त यांच्या …
Read More »व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी येथे जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण
बेळगाव : विश्व भारत सेवा संचलित व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने विद्यार्थिनींना गणवेश वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही.बी.एस.एस संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगावचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण शिंदे, संजय …
Read More »कन्नड सक्तीविरोधी महामोर्चासाठी येळ्ळूरमध्ये मशाल मोर्चा; शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
येळ्ळूर : येळ्ळूर म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणूक काढून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने सोमवार दि. 22 जून रोजी कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाची जनजागृती करण्यात आली. प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने असंविधानिक अत्याचार केले आहेत. कायद्यानुसार कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेलाही घटनात्मक हक्क मिळावेत. अन्यथा मराठी …
Read More »तुरमुरीतील कचरा डेपो हटविण्याची मागणी; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : ग्रामीण भागातील तुरमुरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कचरा डेपोमुळे नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून हा डेपो तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा प्रशासनाने यापूर्वी कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच …
Read More »कन्नड सक्तीविरोधी आंदोलनाला विरोध; ‘करवे’चे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ आणि २७ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (करवे) शिवरामेगौडा गटासह काही कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून या आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. करवेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta