Tuesday , August 18 2026
Breaking News

डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : प.पू. कै. डॉ. रमेश महाराज अकोळकर यांचा १५वा पुण्यतिथी सोहळा श्री दत्त-पंढरी (अकोळ) येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांचा “प.पू. सद्गुरु डॉ. रमेश महाराज अक्कोळकर प्रतिष्ठान” यांच्यावतीने २०२६ सालचा पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अनिकेत महाराज कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
गेली तीन पिढ्या शतकोत्तर निरंतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या पंतबाळेकुंद्री घराण्याचा गौरव म्हणून तसेच महापुरातील वैद्यकीय सेवा, कोविड महालाटेतील विनामूल्य सेवा कार्य, आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक अशा अनेक अविरत सुरू असणाऱ्या सेवेचा सन्मान म्हणून हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोबतच डॉ. ईश्वर ढोले (बालरोग तज्ञ) निपाणी यांचाही वैद्यकीय सेवा योगदान बद्दल मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला.
कोल्हापूर येथील प्रसिद्ध गायिका सौ. रमा कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायन सेवा अतिशय उत्तमरीत्या केल्यामुळे त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
दत्त पंढरी मंदिर येथील अविरत सेवेकऱ्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
दुपारी अभिषेक, आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील व विविध भागातून गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; ७५ वर्षीय वृद्धावर जीवघेणा हल्ला

Spread the love  महांतेश नगरमध्ये संतापजनक घटना; पाय व मांडीला सात-आठ वेळा चावा, मोठ्या प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *