Tuesday , August 18 2026
Breaking News

ग्रामीण विद्यार्थ्यांना अनमोल सोसायटीकडून क्रीडा साहित्याचे वाटप

Spread the love

 

खानापूर : बेळगाव येथील अनमोल मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील हलशी व हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

अनमोल सोसायटीतर्फे दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, यंदाही विद्यार्थ्यांसाठी हॉलीबॉल, फुटबॉल तसेच इतर आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खेळांमध्ये अधिक प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागणार आहे.

हलशी येथील सरकारी मराठी शाळेत झालेल्या साहित्य वितरण कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस. टी. पाटील, मिलिंद देसाई, कृषी पतीन सोसायटीचे माजी संचालक अनंत देसाई, शाळा सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष नरसिंग घाडी तसेच शिक्षक उपस्थित होते.

तर हलशीवाडी येथील सरकारी शाळेत झालेल्या कार्यक्रमास शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नरसिंग देसाई, प्रसाद देसाई, लव देसाई, रामा देसाई, मुख्याध्यापक विनायक फंडी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अनमोल मल्टीपर्पज सोसायटीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

About Belgaum Varta

Check Also

जांबोटी विद्यालयातील कुस्ती मॅटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love  जांबोटी : विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *