Monday , August 17 2026
Breaking News

“मला त्या मुलीपासून वाचवा” रामदुर्गच्या राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीत सापडले अनोखे पत्र

Spread the love

 

रामदुर्ग : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील पदकोट गल्ली येथील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या दानपेटीची नियमित मोजणी करताना एक आगळेवेगळे पत्र सापडल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पत्रातील मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीतील रक्कम मोजत असताना कर्मचाऱ्यांना एका अज्ञात व्यक्तीने लिहिलेले पत्र आढळले. त्या पत्रात, “स्वामी, मला एका मुलीपासून वाचवा,” अशी थोडक्यात विनंती करण्यात आली होती. पत्रावर कोणतेही नाव, पत्ता किंवा ओळख नमूद करण्यात आलेली नव्हती.

देवस्थानातील दानपेट्यांमध्ये नोकरी, शिक्षण, विवाह, आरोग्य किंवा कौटुंबिक समस्यांबाबत प्रार्थनापत्रे टाकण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, या पत्रातील आशय वेगळा असल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहे.

पत्राचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याकडे विनोदी दृष्टीने पाहिले आहे, तर काहींनी हे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अडचणीचे किंवा मानसिक तणावाचे प्रतीक असू शकते, असे मत व्यक्त केले आहे. या पत्रामागील व्यक्तीची ओळख अद्याप समोर आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया! भक्ती, श्रद्धा आणि परंपरेने रंगली नागपंचमी

Spread the love  बेळगाव : श्रावणाच्या पवित्र महिन्याची सुरुवात होताच वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *