Monday , August 17 2026
Breaking News

स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांना ताराराणी पी.यू. कॉलेजमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

 

दोन मिनिटे मौन पाळून व्यक्त केली आदरांजली; शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याची भावना

खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांच्या दुःखद निधनाबद्दल खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, स्व. राजेश हलगेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून संपूर्ण मराठा मंडळ परिवार सुन्न झाला. त्यांचे अकाली निधन ही केवळ संस्थेची नव्हे, तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राची मोठी आणि कधीही भरून न निघणारी हानी आहे.

ते पुढे म्हणाले की, स्व. हलगेकर हे अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देणारे नेतृत्व होते. संस्थेच्या विस्तारात आणि प्रगतीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक उपक्रमांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या रूपाने समाजाभिमुख, पारदर्शक आणि शिक्षण क्षेत्रासाठी झटणारे नेतृत्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

स्व. राजेश हलगेकर यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आणि विद्यार्थ्यांना सक्षम घडविण्याचा संकल्प करूया, अशी भावनिक सादही प्राचार्य अरविंद पाटील यांनी उपस्थितांना घातली.

या श्रद्धांजली सभेस प्रा. टी. आर. जाधव, प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. आर. व्ही. मरित्तमण्णावर, प्रा. व्ही. एम. गावडे, प्रा. एस. एस. कणबरकर, प्रा. एम. वाय. देसाई, प्रा. जे. एफ. शिवटणकर, क्रीडा शिक्षक प्रशांत पांखरे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

जांबोटी विद्यालयातील कुस्ती मॅटचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love  जांबोटी : विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *