Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

मास्टर वेदांत आनंद मिसाळे याचे सी.बी.एस्.ई. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावचा विद्यार्थी मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने सी.बी.एस.ई. साऊथ झोन–II जलतरण स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही स्पर्धा दि. २७ ते २९ जुलै …

Read More »

प्रख्यात संवादिनी वादक सुधांशु कुलकर्णी यांना गुरु गौरव पुरस्कार

  बेळगाव : बंगलोर येथील सतीश हंपीहोळी म्युझिक फाउंडेशन ट्रस्टने ‘ताल यात्रा’ या संगीत-नृत्य संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंडित बसवराज बेंडिगेरी यांच्या स्मृत्यर्थ सुधांशू कुलकर्णी यांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ​प्रमुख पाहुणे कर्नाटक कलाश्री मृत्युंजय शेट्टर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गायन, वादन, …

Read More »

सीमाभागातील मराठी शाळांना पुस्तके देण्यास हालचाल; युवा समितीच्या लढ्याला यश

  बेळगाव : सीमाभागातील शासकीय मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तके वेळेवर न मिळणे आणि अप्रत्यक्षपणे कन्नड भाषेची सक्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या समवेत विविध केंद्रीय आणि राज्य पातळीवर याबाबत तक्रार दाखल केली होती. भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या रक्षणासाठी युवा समितीने …

Read More »

‘चला खेळूया मंगळागौर 2026’चा रंगतदार महोत्सव 8 व 9 ऑगस्टला

  सखी ग्रुपचा महिलांच्या कला, संस्कृती आणि उद्योजकतेला नवा मंच; विविध स्पर्धा, स्टॉल्स आणि सांस्कृतिक मेजवानीची पर्वणी बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, लोककला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 8 ऑगस्ट …

Read More »

रेशन दुकानदारांवरील कामाचा ताण वाढला; एका महिन्यातच दोन महिन्यांचे धान्य वितरण

  ऑगस्ट-सप्टेंबरचे रेशन एकाचवेळी; दोनदा बायोमेट्रिक अनिवार्य, ई-केवायसीमुळे ग्राहकांचीही धावपळ बेळगाव : रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसी मोहिमेचे काम सुरू असतानाच आता रेशन दुकानदारांवर आणखी एका मोठ्या जबाबदारीची भर पडली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे धान्य याच महिन्यात एकाचवेळी वितरित करण्यात येणार असल्याने रेशन दुकानदारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. या …

Read More »

‘घर भाड्याने हवे’च्या बहाण्याने वृद्धेला ८८ हजारांचा गंडा! ओटीपी मिळवत सायबर भामट्यांचा नवा फंडा

  बेळगाव : सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विळखा घालत असून आता ‘घर भाड्याने घेणार’ या बहाण्यानेही नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियावर घर भाड्याने देण्याची जाहिरात करणाऱ्या ८१ वर्षीय वृद्धेला विश्वासात घेत सायबर भामट्यांनी ८८ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना हनुमाननगर येथे उघडकीस आली आहे. या …

Read More »

लष्करी अधिकाऱ्याचे बंद घर फोडले; ९ लाखांचे दागिने लंपास

  प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेल्याची साधली संधी; लष्करी वसाहतीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह बेळगाव : शहरातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी वसाहतीतच चोरट्यांनी धाडसी डाव साधला. प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या बंद घराचा कडीकोयंडा फोडून ९ लाख १९ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे …

Read More »

श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती

  संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न बेळगाव : श्रीभक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासाच्या जोरावर आपली घौडदौड सतत चालू ठेवली आहे.सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेने नवी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी आज रविवारी पार पडलेल्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत …

Read More »

गोकाकजवळ बस-दुचाकीची भीषण धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

  गोकाक : गोकाक तालुक्यातील कोन्नूरजवळ गुरुवारी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (NWKRTC) बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मूल गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिडकलहून गोकाककडे येणाऱ्या बसची गोकाक फॉल्स येथील पॉर्बस शाळेतून …

Read More »

आंदोलनांनी वेठीस धरला चन्नम्मा चौक!

  ‘नो प्रोटेस्ट झोन’ घोषित करण्याची नागरिकांची संतप्त मागणी बेळगाव : शहराच्या वाहतुकीची जीवनवाहिनी मानला जाणारा कित्तूर राणी चन्नम्मा चौक आता आंदोलनकर्त्यांचा कायमस्वरूपी अड्डाच बनला आहे. कोणत्याही मागणीसाठी मोर्चा असो, रास्ता रोको असो किंवा निदर्शने असोत, प्रत्येक आंदोलनाची सुरुवात याच चौकातून होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडत आहे. …

Read More »