Monday , August 17 2026
Breaking News

प्रख्यात संवादिनी वादक सुधांशु कुलकर्णी यांना गुरु गौरव पुरस्कार

Spread the love

 

बेळगाव : बंगलोर येथील सतीश हंपीहोळी म्युझिक फाउंडेशन ट्रस्टने ‘ताल यात्रा’ या संगीत-नृत्य संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंडित बसवराज बेंडिगेरी यांच्या स्मृत्यर्थ सुधांशू कुलकर्णी यांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

​प्रमुख पाहुणे कर्नाटक कलाश्री मृत्युंजय शेट्टर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “गायन, वादन, नर्तन असा कोणताही भेद न ठेवता जगभरातील सर्व कलांचा विकास व्हावा, यासाठी सतीश हंपीहोळी प्रयत्नशील आहेत.”
​या कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ व्होडे पी. कृष्णा, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र भट, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश हंपीहोळी, कांती स्विट्सचे मालक शैलेंद्र शर्मा, मृदंगवादक आनूर अनंतकृष्ण शर्मा, साहित्यिक आशुतोष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *