Sunday , August 16 2026
Breaking News

मास्टर वेदांत आनंद मिसाळे याचे सी.बी.एस्.ई. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगावचा विद्यार्थी मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने सी.बी.एस.ई. साऊथ झोन–II जलतरण स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक (Bronze Medal) पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ही स्पर्धा दि. २७ ते २९ जुलै २०२६ दरम्यान डॉ. राजू डेव्हिस इंटरनॅशनल अँड सैनिक स्कूल, माला, त्रिशूर (केरळ) येथे पार पडली. वेदांतने कठोर परिश्रम, नियमित सराव, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले.
वेदांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय एस.एम.सी. समितीचे चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रा. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रा. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी वेदांतचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, भविष्यातही वेदांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच उज्ज्वल कामगिरी करून शाळेचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *