Sunday , August 16 2026
Breaking News

शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Spread the love

 

 

बेळगाव : माजी आमदार तथा शिक्षणमहर्षी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा वाढदिवस शुक्रवारी (७ ऑगस्ट) सिद्धार्थ बोर्डिंग, शहापूर येथे मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विठ्ठल पोळ आणि प्राचार्य सुरेंद्र देसाई यांनी नंदीहळ्ळी यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी प्राचार्य सुरेंद्र देसाई, विठ्ठल पोळ, पै. मारुती घाडी, ह.भ.प. मारुती नाईक, हिरालाल चव्हाण, अमर हिरेमठ, संजय चौगुले, सौ. ताई कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संतोष होंगल यांनी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याला अधिक बळ मिळावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. उपस्थितांनीही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *