Monday , August 17 2026
Breaking News

श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती

Spread the love

 

संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

बेळगाव : श्रीभक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासाच्या जोरावर आपली घौडदौड सतत चालू ठेवली आहे.सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेने नवी गोल्ड लोन सेवा सुरू केली आहे, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी आज रविवारी पार पडलेल्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

न्यु गुडशेड रोड येथील श्रीमाता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत पुढे बोलताना ज्योती अग्रवाल म्हणाल्या, आजच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.अशावेळी सर्वसामान्यांना दागिने खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. याचा विचार करून आमच्या संस्थेने सभासदांना अत्यंत लाभदायी अशी गोल्ड लोन योजना सुरू केली आहे.सभासदांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून कर्ज करून कर्ज वितरण, वेळेत थकबाकी वसुली आणि पारदर्शक सेवा यावर भर देत संस्थेने प्रगतीची वाटचाल चालविली आहे. यावर्षी संस्थेला 29 लाख 78 हजार 610 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालिका श्वेता देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संस्थेच्या कार्याची माहिती देताना म्हणाल्या, सचोटीच्या कारभारामुळे संस्थेला नेहमी अ वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 66.83 कोटींवर पोहोचली आहे. संस्थेकडे 28.87 कोटींचे खेळते भांडवल असल्याची माहिती देतानाच देसाई यांनी अहवाल वाचन करून, नफा तोटा पत्रक, ताळेबंद सादर केला. यावेळी सभेसमोर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना मोठ्या संख्येने उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सोसायटीचे मॅनेजर अतुल कुलकर्णी यांनी मागील वर्षाचा सर्वसाधारण सभेचा वृत्तांत सादर केला.

यावेळी व्यासपीठावर संचालिका वंदना चव्हाण, शोभा किल्लेकर, कल्पना देसाई, ज्योती पाटील, श्रद्धा रेवणकर उपस्थित होते.सभेच्या शेवटी श्रद्धा रेवणकर यांनी सर्वांचे आभार मानले.सर्वसाधारण सभा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे रिकव्हरी ऑफिसर सुनील पाटील यांच्यासह सर्व कार्यकारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *