Monday , August 17 2026
Breaking News

गोकाकजवळ बस-दुचाकीची भीषण धडक; चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

गोकाक : गोकाक तालुक्यातील कोन्नूरजवळ गुरुवारी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या (NWKRTC) बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मूल गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिडकलहून गोकाककडे येणाऱ्या बसची गोकाक फॉल्स येथील पॉर्बस शाळेतून कोन्नूरकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. या अपघातात सैफ मुल्ला (२९), त्यांची मुलगी सिजा मुल्ला (४) आणि इम्तियाज बडगाव (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील जिहान शाहरुख कुडचीकर हे मूल गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर बसचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार बसचालकाचा शोध घेत पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *